रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

हिरवाईने नटलेला बामणोली परिसर!

भोरपासून गाडीवरून सातारा आणि तेथून बामणोली अंदाजे 40 किलोमीटर अंतर आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने मधे थांबत थांबत कास तलावाच्या दिशेने जाता येते. काही अंतर गेल्यावर सातारा शहर लागते. तिथेच दक्षिणेला सज्जनगड दिसतो. तिथून पुढे दहा कि. मी. अंतरावर कन्हेर व उमरेडी ही दोन धरणे दिसतात. काही अंतर पुढे जाताच कास तलाव दिसतो. ऐन पावसाळ्यात हा कास तलाव आणखीनच सुंदर दिसतो. निसर्गाची देणगी लाभलेला हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या कास तलावाचे वैशिष्ट्‍य असे, की त्याचे पाणी उन्हाळ्यातही कमी होत नाही. कास तलावानंतर बामणोली जाता येते. डोंगरातील वळणावळणाचा रस्ता आणि पावसामुळे तयार झालेले लहान मोठे धबधबे यांच्यामुळे वातावरण सुखावह झाले असते. 

बामणोलीवरून पुढे कोयना धरणाच्या जलाशयाला भेट देण्यासाठी जाता येते. कोयना धरणातील तीन नद्यांचा संगम जिते होतो, त्या ठिकाणी बोटीने जाता येते. त्यानंतर विनायकनगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मठाला भेट देऊ शकता. येथील मं‍‍दिरात गणपतीची सुबक व कोरीव मूर्ती आहे. तिथेच जवळ शिवाजी महाराजांचे स्मारक आणि अष्टकोनी मठ आहे. तिथे शासनाने बोटीसाठी धक्का बांधला आहे. या ठिकाणी असलेले शांत वातावरण मनाला खूप भावते. संपूर्ण जंगलाचा परिसर, तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन असा निसर्गसौंदर्याचा उत्तम नमुना अनुभवता येतो.