शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (16:13 IST)

लवासा हे एक सुंदर ठिकाण आहे, कुटुंबासोबत प्रवास करण्याची योजना आखू शकता

भटकंती करायला सगळ्यांनाच आवडतं.भटकंतीचा विचार केला की डोळ्यांसमोर तेच पर्वत आणि समुद्रकिनारे दिसतात. पण भारतात भेट देण्यासारखे बरेच काही आहे, जिथे आपण  कुटुंबासह जाऊ शकता आणि आपण जोडीदारासोबत फिरायलाही जाऊ शकता. महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे, जे अनामिक असले तरी पर्यटनासाठी तर ते खूप सुंदर आहे. हे ठिकाण लवासा आहे. या ठिकाणी एकदा भेट दिलीत तर तिथून परत यावेसे वाटणार नाही. .
 
हे ठिकाण महाराष्ट्रातील पुण्याजवळ आहे. पुण्याहून या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या ठिकाणी गेल्यावर येथील सौंदर्य पाहून आनंदित व्हाल. वाटेत तलाव, लहान लहान धबधबे आहेत, फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत आणि वाटेत हलका पाऊस असेल तर हे ठिकाण अजूनच सुंदर दिसते. अशा परिस्थितीत आपण येथे मक्याचे कणीस खाण्याचा आस्वाद जरूर घ्या. वरसगाव तलावाच्या काठावर असल्याने लवासा शहरात जलक्रीडा खेळल्या जातात. मायानगरी मुंबईपासून  विविध राज्यांतून लोक येथे फिरायला येतात. हे ठिकाण हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. 
 
लवासामध्ये असलेला घाणागड किल्ला ताम्हिणी घाटाजवळ आहे. मध्ययुगीन काळात बांधलेल्या या किल्ल्यानं एकेकाळी मराठे, पेशवे आणि इंग्रज यांच्यातील अनेक युद्धे पाहिली आहेत हा किल्ला त्या युद्धाचा साक्षी आहे. मुठा नदीवर वसलेले टेमघर धरण हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे तसेच एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. आजूबाजूची हिरवळ आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण सेल्फी पॉइंट म्हणूनही ओळखले जाते, येथे आपण  सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत फिरायला जाऊ शकता.