बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (22:21 IST)

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर जिथे सूर्याचे किरणं देवीआईची पूजा करतात

दक्षिण व उत्तर भारतात महालक्ष्मी मातेची अनेक मंदिरे असली तरी त्यापैकी काही फार प्राचीन आहेत. मुंबईचे महालक्ष्मी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मी आणि अष्टविनायक यांची मंदिरेही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. परंतु यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या.
 
1 मुंबई पासून सुमारे 400 किमी दूर कोल्हापूर महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे.येथे धनप्रदायिनी देवी लक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे.
 
2 असे म्हणतात की हे महालक्ष्मी मंदिर 7 व्या शतकात चालुक्य शासक कर्णदेव यांनी बांधले होते. यानंतर, हे नवव्या शतकात शिलाहार यादव यांनी पुन्हा बांधले.
 
3 मंदिराच्या मुख्य गर्भगृहात, महालक्ष्मीची 40 किलोची मूर्ती स्थापित केली आहे, ज्याची लांबी सुमारे4 फूट आहे. असे म्हणतात की येथील लक्ष्मीची मूर्ती सुमारे 7,000 वर्ष जुनी आहे.
 
4 हे मंदिर 27,000चौरस फुटांपर्यंत पसरलेले आहे आणि त्याची उंची 35 ते 45 फूट आहे.
 
 
5 या मंदिराची सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे देवी लक्ष्मीची पूजा सूर्याच्या किरणांशिवाय अन्य कोणीही करत नाही. 31 जानेवारी ते 9 नोव्हेंबर या काळात सूर्याच्या किरणां आईच्या पायाला स्पर्श करतात  आणि 1 फेब्रुवारी ते 10 नोव्हेंबरपर्यंत सूर्यकिरण आईच्या मूर्तीच्या पाया पासून छाती वर येतात आणि नंतर 2 फेब्रुवारी ते 11 नोव्हेंबर या काळात   सूर्यकिरण पायापासून संपूर्ण आईच्या शरीराला स्पर्श करतात.
 
6 किरणांच्या अद्भुत प्रसारामुळे या काळाला किरण उत्सव किंवा किरणोत्सव म्हणतात, जे स्वतःच खूप खास आहे. या मंदिराच्या बंद खोल्यांमधून हा खजिना बाहेर आला.