शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (16:25 IST)

मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असून तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मी वैफल्यग्रस्त नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसदेखील कोकण दौऱ्यावर असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
 
“त्याच्यावर मला काही राजकीय बोलायचं नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचं समाधान आहे. आम्ही त्याचं राजकारण करत नाही. पण मग जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? मग येथे मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
 
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही येता आणि जाता….मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिलं नाही. गेल्यावेळचे निसर्ग वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”.