शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (15:40 IST)

माथेरान मिनी ट्रेनमधून पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली

matheran toy train
माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. नियंत्रणात आलेली करोनाबाधित रुग्णांची संख्या आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी माथेरानला जाणे पसंत केले.
 
मुंबईच्या जवळ असलेले उत्तम पर्यटन स्थळ अशी माथेरानची ओळख आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला बहुसंख्य पर्यटक भेट देत असतात. करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर अनेक पर्यटकांनी माथेरानला धाव घेतली होती. वृक्षपल्लीचे दर्शन घडवत डोंगर माथ्यापर्यंत धावणारी माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल एक लाख ५४ हजारांहून अधिक पर्यटकांनी माथेरानच्या मिनी ट्रेनमधून सफर केली. त्यामुळे मध्य रेल्वेला एक कोटी १२ लाख रुपये महसूल मिळाला. त्याचबरोबर एप्रिल – ऑगस्ट २०२२ या कालावधीत १२ हजार ०७४ पार्सलची वाहतुकही करण्यात आली.