Mother's Day Special आईला मुंबईतील या ठिकाणी फिरायला घेऊ जा
महालक्ष्मी मंदिर
मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी भुलाभाई देसाई मार्गावरील हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते. तुम्ही नक्कीच तुमच्या आईला येथे घेऊन जाऊ शकतात.
सिद्धिविनायक मंदिर
भारतात अनेक मोठी आणि प्राचीन गणपती मंदिरे आहे. यापैकी एक मंदिर म्हणजेच म्हणजेच सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईत आहे जिथे लोक लांबून येतात. सेलिब्रिटीही या मंदिराला भेट देतात. येथे श्रीगणेशाचे दर्शन व पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या आईसोबत येथे भेट देऊ शकतात.
मुंबादेवी
मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.मूंबईचे नाव कोळी बांधवांच्या या देवीआई च्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. हे मंदिर नवसाला पावणारे आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. या सुंदर मंदिरात तुम्ही नक्कीच तुमच्या आईला घेऊन जाऊ शकतात.
जुहू बीच
दादर बसस्थानकापासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा खूपच आकर्षक आहे. विलेपार्ले येथे असलेला हा समुद्रकिनारा लोकांना सहज आकर्षित करतो. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हा समुद्रकिनारा त्याच्या स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे.
गेटवे ऑफ इंडिया
अरबी समुद्राच्या काठावर उभी असलेली इमारत गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईचे जगाचे प्रवेशद्वार आहे. गेटवे ऑफ इंडियाचे महत्त्व आणि लोकप्रियता यावरून अंदाज लावता येते की मुंबईला येणारे पर्यटक सामान्यतः शहरात प्रथम गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी जातात.
एलिफंटा गुफा
आधुनिक शहरात प्राचीन लेणी पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या एलिफंटा लेण्या भगवान शिव यांना समर्पित आहे. गुहेच्या आत दगड कोरीव काम करून भगवान शिवाच्या मूर्ती बनवल्या आहे. ज्या हत्तीच्या पुतळ्यामुळे या लेण्यांना एलिफंटा हे नाव पडले. आईसोबत तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकतात.