1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

Saint Namdev Payari Pandharpur संत नामदेव महाराज मंदिर तीर्थक्षेत्र नरसी

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. यापैकी प्रमुख संत म्हणजे संत नामदेव महाराज होय. संत नामदेव महाराजांनी समाजाला भक्ती मार्ग शिकवला. भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात संत आहे. तसेच संत संप्रदायचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचें आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असून महाराष्ट्रातील एक थोर संत असे. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. ह्यांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके 1192 (इ.स.1270)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला, रविवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी  गावी झाला. संत नामदेवांनी आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ मध्ये पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले. तेथे त्याचे समाधी स्थान  तयार करण्यात आले असून पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरी आहे. 
तीर्थक्षेत्र नरसी
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी या तीर्थक्षेत्री संत नामदेव यांचे मोठे स्मारक आहे. तसेच हे संत नामदेव संस्थान नावाने प्रसिद्ध असून हे गाव हिंगोली शहरापासून १७ किमी अंतरावर आहे.हे  तीर्थक्षेत्र प्रसिद्ध कवी संत नामदेव यांच्या जन्मस्थळ म्हणून देखील ओळखले जाते. नरसी हे या गाव कयाधू नदीच्या किनार्यावर वसलेले आहे.याच नदीकाठी संत नामदेवांचे सुंदर असे मंदिर आहे.
 
संत नामदेव मंदिर नरसी  
नरसी येथील संत नामदेव मंदिर हे पवित्र मंदिर संत नामदेव दामाजी रेलेकर यांना समर्पित असून या पवित्र मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. तसेच हे हिंदू व शीख धर्मीयांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात संत नामदेवांची नियमित पूजा केली जाते. विशेष म्हणजे संत नामदेव यांचा या नरसी बामणी या गावात झाला व काळानुसार नाव बदलून नरसी नामदेव ठेवले गेले. अशी मान्यता आहे की, पंढरपूर  वारीसाठी गेलेल्या भाविकांची वारी संत नामदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे परतवारीला नरसी नामदेव येथे भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे हे मंदिर    प्रसिद्ध आहे. तसेच संत नामदेव यांच्या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार सुरू आहे.  व मंदिरात नव्याने उभारण्यात आलेली संत नामदेवाची पूर्णाकृती मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मूर्ती दृष्टीस पडल्यानंतर प्रत्येक भाविकाला संधान मिळते. तसेच मंदिराचे  नक्षीकाम भाविकांना आकर्षित करीत आहे.  
संत नामदेव मंदिर नरसी जावे कसे? 
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे जाण्यासाठी बस, ट्रेन उपलब्ध आहे. तसेच हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांना जोडलेला आहे. मंदिरापासून नांदेड विमानतळ जवळचे विमानतळ असून ते ८५ किमी अंतरावर आहे. विमातळावरून टॅक्सी किंवा खासगी वाहनाने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते.