सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (08:08 IST)

ट्रेकिंगची मजा काही औरच

मित्रमंडळींसोबत मस्त बाहेर पडायचं, ट्रेकिंगचं सामान घ्यायचं. गड, किल्ला, डोंगर गाठायचा आणि चढायला सुरूवात करायची. एकमेकांच्या साथीने, गप्पा मारता मारता डोंगर कधी आणि कसा सर होतो हे आपल्याला कळतच नाही. ट्रेकिंग हा एक धाडसी प्रकार आहे. फिरण्यासोबतच काहीतरी वेगळं केल्याचं समाधान ट्रेकिंगमुळे मिळतं. नवख्या ट्रेकर्ससाठी काही सोपे पर्यायही आहेत. ट्रेकिंगमध्ये मुरलेल्यांना अवघड वाटांवरून चढता येतं. ट्रेकिंगसाठी फार लांब जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर तुम्ही ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता. ट्रेकिंगचे हे पर्याय ट्रेकर्सना नक्कीच आवडतील.
 
* लोणावळ्याजवळ राजमाची किल्ला आहे. राजमाचीवर ट्रेकिंग करणं खूप सोपं आहे. अवघ्या 40 मिनिटांमध्ये हा किल्ला चढता येतो. वन डे ट्रेकिंगसाठी हा पर्याय बेस्ट आहे.
* विसापूर हे सुद्धा खूप चांगलं ठिकाण आहे. पुण्याहून विसापूर साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. ट्रेकर्सना इथे वेगळाच आनंद मिळतो. गडावर पोहोचल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांचा खूप सुंदर नजारा पाहायला मिळतो.
* हरिश्चंद्रगड गाठण्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागेल. पुण्याहून हरिश्चंद्रगड साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी पाच मार्ग आहेत. गडावरून सूर्यास्ताचं विहंगम दृश्य दिसतं. ट्रेकर्सही हा क्षण चुकवता कामा नये.
* पुण्याहून 50 किलोमीटरवर असणार्या् राजगडला ही जाता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा गड चढणं ही शिवप्रेमींसाठी पर्वणीच. पावसाळ्यात राजगडावर जाण्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र इथे कधीही जाता येतं. राजगडावर इतिहासाच्या खुणा धुंडाळता येतील.