शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:59 IST)

मराठी अभिनेत्री पूजा सावंत करतेय या मराठी अभिनेत्याला डेट

अभिनेत्री पूजा सावंतने मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ही अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. विशेष म्हणजे दरवेळी ग्लॅमरस फोटोशूट किंवा अभिनयामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री यावेळी एका अन्य कारणामुळे चर्चेत आली आहे. पूजा सावंत मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
हिंदी आणि मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलेल्या अभिनेता गश्मीर महाजनीला पूजा सावंत डेट करत असल्याचं चर्चा जोर धरू लागले आहे. त्याला कारणही तसेच आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीक सुरु असतानाचा या दोघांमधील खास मेसेज समोर आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.