शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

Vidharbh Jungale Safari जंगल सफारी विदर्भातील

tadoba
विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. य अभयारण्यांना   भेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय  प्राणिसंग्रहालय लवकर झाले तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.
 
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी निविदा काढली होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्राणिसंग्रहालाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ आणि खासगी गुंतवणूकदारांच्या भागीदारीतून कंपनीची स्थापना केली जाणार आहे. 
 
नागपूर येथील अशफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला पूर्वीच 1 कोटी 90 लाख रुपये दिले आहेत. कंपनीने या संपूर्ण प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी बांधकामाचा आराखडा आणि डिझाइन तयार केले असून त्यात काही त्रुटी आहेत.
 
jungle safari
प्राणिसंग्रहालयाची वैशिष्टय़े अशी आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग पर्यटनास चालना देणे. वन्यजीवन संवर्धनासाठी संशोधन आणि शिक्षण, जखमी झालेल्या आजारी प्राण्यांच्या तसेच परवानगी नसलेल्या आणि जप्त प्राण्यांचे पुनर्वसन, मानव आणि वन्य प्राणी यांचतील संघर्षाच्या घटना कमी करणे, अद्यावत प्रशिक्षित केंद्र विकसित करणे, रोजगार आणि  स्वंरोजगार उपलब्ध करणे, प्रकल्पातील सुविधा, गोंडवाना बायोपार्क, इंडियन सफारी आफ्रिकन सफारी, रिझर्व्ह राइड, गोरेवाडा रिझर्व्ह, वन्यप्राणी नागरिकांना बघण्यासाठी ठेवणारा बचाव केंद्र आणि प्रजनन केंद्र, पर्यटकांसाठी सुविधा, शिक्षण आणि संशोधन यांचा समावेश राहणार आहे.
 
सध्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. सकाळ, दुपार, संधकाळ अशा तीन वेळात पर्यटक सफारीचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत वन्यप्राणी बचाव केंद्रे उभारली. निसर्ग वाट आणि जंगल सफारी सुरू झाली असून शासनाने परिपत्रक काढले आहे. वन्याप्राणी दत्तक घ्या, त्यांचे मित्र व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
म. अ. खाडिलकर