शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (09:37 IST)

विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला

मुंबई-कसाराजवळ पट्टेवाडी हे लहान खेडेगाव आहे. तेथे पट्टा किल्ला आहे. यालाच विश्रामगड असे म्हणतात. या गडावर अंबा-लिंबा या देवतांचे पुरातन मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती सिंहासनावर आरुढ झाली असून अष्टभुजा स्वरूपात आहे. मूर्तीच्या उजव्या चार भुजापैकी एका भुजेमध्ये चक्र, दुसर्‍या भुजेमध्ये सुरा, तिसर्‍या भुजेमध्ये तलवार तर चौथी भुजा आशीर्वाद देणारी आहे. देवीच्या डावीकडील चार भुजांपैकी एका भुजेमध्ये शंख, दुसर्‍या भुजेमध्ये  गदा, तिसर्‍या भुजेमध्ये त्रिशूल आणि चौथ्या भुजेमध्ये ढाल आहे.
 
देवीची साडी हिरव्या रंगाची असून चोळी लाल रंगाची आहे. अंबा देवीच्या बाजूला लिंबा देवीची उभी मूर्ती आहे. देवीचा उजवा हात आशीर्वाद देणारा असून डाव हातात कमळ आहे. या मूर्तीची स्थापना 1672 ते 1675 या दरम्यान झाली. छत्रपती शिवाजी महाराज जालनच्या लढाईत विजयी होऊन विश्रंतीसाठी 15 दिवस या गडावर राहिले. त्यामुळे या गडाला विश्रामगड हे नाव पडले.
 
विश्रामगडाला पायर्‍या नसल्याने डोंगरातील पायवाटेने जावे लागते. तेथील परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या ठिकाणी छत्रपती शहाजीराजे यांच्या राजधानीचे प्रमुख ठिकाण होते. बाजूला हरिश्चंद्रगड असून त्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच तिरडे या प्रदेशालाही पुराणकाळापासून महत्त्व आहे.
 
सीतेचे रावणाने अपहरण केलनंतर जटायू पक्षी तेथे आला आणि रावणाने त्याला ठार केले. तेव्हा तो जिथे पडला तेथे त्याच्या पंखांचा आकार उमटला आहे. तसेच सीता प्रभू रामचंद्रांच्या विोगाने जेथे रडत बसली त्या ठिकाणाला तिरडे असे नाव पडले.
 
पुढे भंडारदरा हे इंग्रजांच काळातील धरण आहे. विश्रामगडाचा परिसर निर्जन आहे. गडावर आणि परिसरात माकडे पाहावास मिळतात. तेथे सायंकाळी वाघ येतात आणि देवीच्या देवळात जाऊन बसतात. देवीच्या मंदिराला दरवाजा तसेच विजेची सोय नाही.
 
तेथील कळस पावसाळत गळतो. पावसाळ्यात जोरदार पाऊस असल्याने जाणे कठीण आहे.
 
लिंबा देवीचा उजवा आशीर्वाद देणारा हात कोपरापासून तुटून मूर्ती खंडित झाली आहे. तेथे गडावर पूर्वी लक्ष्ममहाराज नावाचे वैद्य राहायचे. तेथे त्यांचा  दवाखाना होता. तो आजही पाहावास मिळतो. देवीच्या मंदिरात जाताना अभिषेक करायचा असल्यास सर्व साहित्य न्यावे लागते. शिवकालीन पाणीसाठा अद्याप सुस्थितीत आहे.