शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By नितिन फलटणकर|

13 तारखेला राज्यात सारं काही 'शट डाऊन'

लोकसभा निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरल्याने आता विधानसभा निवडणूकांमध्ये राज्यातील सरकारी कार्यालयांसह, हॉटेल्स, मॉल्स, शाळा, आणि चित्रपटगृहंही बंद ठेवली जाणार आहेत.

मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस मानला जात असल्याने निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत मॉल्स, थिएटर बंद ठेवण्यास सांगितले आहे.

निवडणूकांने दखल दिल्याने महाराष्ट्र सरकारही खडबडून जागे झाले असून, सरकारने राज्यात 'शट डाऊन' करण्याचे आदेश काढले आहेत.

रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट १९५१ च्या कलम १३५ बी नुसार मतदानाच्या दिवशी दुकाने, निवासी हॉटेल, खागृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम व इतर आस्थापनांमधील कामगारांना भरपगारी सुटी देणे बंधनकारक आहे. यंदा त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

१३ ऑक्टोबर रोजी सर्व हॉटेल, नाटय-चित्रपटगृहे बंद ठेवावी लागतील. कामगारांना भरपगारी रजा द्यावी लागेल, असे कामगार आयुक्त अरविंद कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. खासगी टॅक्सी सेवाही बंद ठेवावी लागणार आहे. कायदा मोडणार्‍या मालकांवर कामगार खात्याच्या प्लाइंग स्क्वॉडमार्फत नजर ठेवली जाणार असून प्रसंगी अशांना अटकही होईल.