गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:53 IST)

राजगड किल्ला

राजगड(शासित किल्ला) हा किल्ला भारताच्या पुण्यात जिल्ह्यात एक डोंगरावरील किल्ला आहे. ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची 26 वर्षे राजगडा मध्ये घालविले. हा किल्ला त्या 17 किल्ल्या पैकी एक आहे ज्यांनी वर्ष 1665 मध्ये जयसिंगाच्या विरोधात पुरंदराच्या संधीमध्ये दिले. राजगड अनेक ऐतिहासिक घटनांचे ठिकाण आहे. 
ह्याच गडात छत्रपतींच्या मुलाचे राजाराम राजे ह्यांच्या जन्म, छत्रपती शिवाजी राजेंच्या महाराणी सईबाईंचा मृत्यू आणि अफजलखानाचे शीर इथेच दफन करण्यात आले.तसेच आग्रेतून छत्रपती शिवाजी महाराज इथेच आले.

जायचे कसे- 
कर्जत,पाली,पुणे,गुंजवणे या बस स्थानकावरून  जाणाऱ्या एसटी बस,खाजगी वाहने जाऊ शकतात.
राजगडावर जाण्यासाठी चहूबाजूंनी पाऊलवाट आहे. वेळवंड,मळे, पाल, भुतुंडे, खुर्ज, गुंजवणे,वाजेघर,फणसी, या मार्गाने गडावर जाऊ शकतो. 
शिवकालीन राजमार्ग असलेला पाल दरवाजामार्ग गडावर जाण्यासाठी साखर -वाजेघर पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. 
पुणे वेल्हे मार्गाने मार्गासनी -गुंजवणे गावातून गेलेला रास्ता चोरदिंडीतून पद्मावती माचीवर येतो. 
खोऱ्यातील भुतांडे गावातून अळू दारातून गडावर जाऊ शकतो. 
तोरण्याच्या बुधलामाची वरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणाऱ्या या मार्गा वरून सहा-सात तासात गडावर पोहोचतो. 
 
बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळे- 
1 सुवेळा माची 
पद्मावती तळाच्या बाजूने वर गेल्यावर रामेश्वर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून वर आल्यावर एक तिठा आहे त्यातील एक मार्ग बालेकिल्ल्याकडे, डावीकडून सुवेळामाची कडे आणि तिसरा उजवीकडील मार्ग संजीवनी माचीकडे जातो. चिलखती बुरुज,चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्टये आहेत.वर जाऊन चंद्र तळे आहे तसेच एक ब्रह्मर्षी मंदिर आहे.इथून सूर्योदय बघणे प्रेक्षकांसाठी जणू एक पर्वणीच आहे. 
 
2 पद्मावती तलाव-
गुप्त दाराकडून पद्मावती माची आल्यावर समोरच तलाव आढळतो या तलावात जाण्यासाठी भिंतीचे कमान तयार केले आहेत. पद्मावती देवीच्या मंदिरासमोर रामेश्वर मंदिर आहे जे पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. या मंदिरात हनुमानाची दक्षिणाभिमुखी मूर्ती आहे.
 
3 राजवाडा-
रामेश्वर मंदिराकडून वर जाताना राजवाड्याचे भग्नावशेष दिसतात. इथून पुढे गेल्यावर अंबारखाना आहे त्यापुढे सदर आहे त्याच्या समोर कोठार आहे या वाड्यात शिवबाग आहे.
पाली दरवाजाचा मार्ग पाळी गावातून येतो.चढण्यासाठी पायऱ्या आहेत या पाली दाराच्या वरील बाजूस बुरुजावर परकोट बांधले आहे आणि प्रवेश दार भक्कम, उंच रुंद आहे या दारामधून अंबारीसह हत्ती यायचे.परकोट्यावर झरोके आहेत ज्यांना फलिका म्हणतात. या मधून तोफे डागायचे. दारातून आत आल्यावर गडावर येतो इथून पद्मावती माची पोहोचतो.  
 
4 गुंजवणे दरवाजा -
हे तीन प्रवेश दाराची मालिका आहे भक्कम बुरुज असलेला साध्या बांधणीचा पहिला दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दाराच्या शेवटी आणि गणेश पट्टी खाली उपडे घेत घेतलेल्या कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत 
या प्रवेश दारातून दोन्ही बाजूने पद्मावती माची लागते.या गडाला एकूण 3 माच्या आहेत.या पैकी सर्वात प्रशस्त माची पद्मावती आहे. इथे पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी,हवालदारवाडा,रत्नशाला,सदर,पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा,पाळी दरवाजा,गुंजवणे दरवाजा,दारुगोळ्याची कोठारे आज देखील आहे.  
 
5 पद्मावती मंदिर- 
इथे पद्मावती देवीचे मंदिर आहे. या मंदिरात एकूण तीन मुर्त्या आहेत. इथे शेंदूर लावलेला तांदळा देवी पद्मावती आहे.मंदिराच्या बाजूला पाण्याच्या टाके आहे. मंदिराच्या समोरच राणी सईबाईंची समाधी आहे.   
 
6 संजीवनी माची -
सुवेळा माची नंतर या माचीचे बांधकाम झाले. इथे चिलखती बुरुज आहे.पाण्याची टाकी आहेत .या माचीवर आळू दरवाज्याने देखील येऊ शकतो.
 
7 आळू दरवाजा- संजीवनी माचीवर येण्यासाठी या दाराचा वापर होतो. 
 
8 बालेकिल्ला- 
राजगडातील सर्वात उंच भाग बालेकिल्ला आहे. चढण चढल्यावर  बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो. ह्याला महादरवाजा म्हणतात. इथून आत गेल्यावर जननी मंदिर आहे. पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोर उत्तर बुरुज आहे. इथून पद्मावती माची आणि सर्व परिसर दिसतो. उत्तर बुरुजाच्या बाजूने ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे.   
या गडावरून  तोरणा,प्रतापगड, सिंहगड,पुरंदर,वज्रगड, मल्हारगड, रोहिडा,रायरेश्वर, लिंगाणा,लोहगड,विसापूर हे किल्ले दिसतात.