गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:53 IST)

तोरणाचा किल्ला किंवा गड

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी जिंकलेले हे पहिले गड आहे. ह्याला प्रचंडगड म्हणून देखील ओळखले जाते.  हे मराठीतील प्रचंड या शब्दापासून निर्मिले आहे. त्याचा अर्थ आहे मोठा किंवा विशाल आणि गडाचा अर्थ आहे किल्ला.या गडाच्या आतील बाजूस अनेक स्मारके बांधली गेली आहेत. हा किल्ला समुद्रतळापासून 4603 फूट उंचीवर आहे.
 
18 व्या शतकात छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या हत्येनंतर मुघल सम्राट औरंगजेबाने गड आपल्या ताब्यात घेतले आणि नंतर त्याचे नाव 'फुतुलगैब'ठेवण्यात आले. 

तोरणा गडावर कसं पोहोचणार -
पुण्याहून प्रवाशांसाठी स्वारगेट बस स्थानकापासून सकाळी 6:30 वाजे पासून बससेवा सुरू होते.संबंधित मार्ग खेडे शिवापूर, चेलाडी/ नसरपूर/ बनेश्वर, विंजर पासून वेल्हे गावात जातात. तोरणाकडे जाणारा मुख्य मार्ग येथून सुरू होतो. 
पावसाळ्यात काही सावधगिरी बाळगावी लागते गडाच्या माथ्यावर जाण्याचे मार्ग कठीण आहे. गडाचे मुख्य दार ''बिनी दरवाजा'' जाण्यासाठी दोन ते तीन तासांचे चढण आहे.
 
प्रेक्षणीय स्थळे-
1 बिनी दरवाजा- 
सभोवतातील परिसरातील नेत्रदीपक दृश्य बिनी दरवाजा हे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. जर आपण वेल्हे गावातून येत आहात तर हा किल्ला बिनी दरवाजाच्या पायथ्याशी आहे.हे मुख्य प्रवेश दार आहे.
 
2 हनुमान बंसियन-
कोठी दाराच्या पूर्वीकडे हनुमान गड नांवाचे एक मजबूत गड आहे.इथे हनुमानाची मूर्ती प्रेक्षणीय आहे. ही मूर्ती सगळ्यांचे लक्ष आकर्षित करते. 
   
3 कोठी दरवाजा -
बिनी दरवाज्याचा रास्ता कोठी दरवाजाकडे नेतो. इथून ताडनाजी मंदिराकडे जाऊ शकता. या मंदिरात देवी सोमाजाई आणि देवी तोरेनाजी ह्यांच्या सुंदर मूर्त्यांचे दर्शन करू शकता.
 
4 बुधला माची -
इथले आणखी एक आकर्षण म्हणजे बुधला माची आहे. जर लक्ष देऊन बघितले तर या माचीची रचना एखाद्या घुबडांप्रमाणे आहे. संजीवती माची जाण्याचे मार्ग अल्लू दारामार्गे जातो.   
 
5 झुंजार माची 
तोरणागडाच्या थोडं पुढे भेळगडात पोहोचता.  प्रसिद्ध झुंजार माची भेळगडाच्या पूर्वी भागेत आहे.
 
6 तोरणेश्वर महादेवाचे मंदिर-
मेंगाई देवी मंदिर परिसरात भग्न वस्तूंचे अवशेष बघायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाणाऱ्या मार्गावर तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे पावसाळ्यात खूप धुके असते. समोरचा माणूस देखील दिसत नाही. परंतु उन्हाळ्यात इथे गेल्यावर तोरणा परिसरातील राजगड, केंजळगड, रोहिडा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड,सर्व परिसर दिसतात.