1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (15:50 IST)

मला पराभव मान्य, मात्र त्यांना विजय अनाकलनीय - पंकजा मुंडे

राज्यात सर्वात चर्चेत असलेली बीड येथील निवडणूक होती. शेवटच्या टप्प्यात भावू आणि बहिण यांच्या नात्यावर आधारली गेल्याने मोठी चुरस निर्माण झाली, मात्र सत्तधारी पंकजा मुंडे यांचा परभव झाला आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे विजयी झाले आहेत.
 
पंकजा मुंडे यांनी परळीत पराभव स्वीकारला सून, जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत आहे. आता यापुढे मी जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम काम करत राहिन, असंही पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आमच्या  मतदारसंघात चांगलं वातावरण होतं, विजयाची खात्री होती, पण हा पराभव मलाच नव्हे, तर ज्यांचा विजय झालाय त्यांनाही अनाकलनीय आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
 
परळीत धनंजय मुंडेंच्या विजयाची फक्त आता औपचारिकता बाकी असून, सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर आघाडी घेतली होती. या जनतेचा कौल स्वीकारत असून याचा अभ्यास केला जाईल, बीडच्या विकासाचं राजकारण लक्षात आलं आहे, अशी सूचक प्रतिक्रियाही पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
 
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पराभव खांद्यावर घ्यायला शिकवलं आहे. आम्ही कायम संघर्ष केलाय. पाच वर्ष सत्तेत असूनही एक क्षणही सत्तेत असल्यासारखा वाटला नाही. ही लढत पूर्ण राज्यातील लढतीकडे लक्ष होते, त्यामुळे आता पंकजा मुंढे पुढे काय करतात हे पहावे लागणार आहे.