जुन्नर येथून ६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा
नव्या स्वराज्याचा नवा लढा या घोषणेसहित राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्ट रोजी होत आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून या यात्रेची सुरुवात होईल. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्ट दरम्यान राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके पादाक्रांत करणार असून पूर्ण ३ हजार किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचेही आ. - जयंत पाटील यांनी सांगितले.