गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (16:22 IST)

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही : चंद्रकांत पाटील

‘आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूनच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही’, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली. संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. 
 
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युती धर्म पाळला नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मांडलिक यांना खडेबोल सुनावले आहे.