शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (16:16 IST)

सोशल मीडियाचा निवडणूक प्रचारासाठी वापर,18 जणांना नोटीस, ग्रुपच्या ऍडमीनला नोटीस

नांदेड निवडणूक विभागाने सोशल मीडियाचा वापर निवडणूक प्रचारासाठी केल्याचा ठपका ठेवत 18 जणांना नोटीस दिल्या आहेत, अशी माहिती माध्यम नियंत्रक रवींद्र चव्हाण यांनी दिली. या प्रकरणी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचार करण्यात आला त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमीनला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. 
 
सोशल मीडिया हे अत्यल्प दरात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी आता वापरलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रचारात येणाऱ्या खर्चाची कुठेही नोंद नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी प्रचारात निश्चित केलेली खर्च मर्यादाही ओलांडली जात असल्याचं समोर आलं आहे.