testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुण्यातील राज ठाकरेंची सभा रद्द, राज गर्जना होणार आज मुंबईत दोन सभेत

raj thackare
Last Modified गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:09 IST)
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुखराज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पुढील सभा मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. यानंतर अखेर सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीची पुढील दोन सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात होणारी पहिली प्रचार सभा पावसामुळे रद्द करावी लागली आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसेचे अध्यक्ष काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग पुण्यातून फुकणार होते. काल झालेल्या पावसामुळे पाऊस सभा रद्द होऊ नये म्हणून मैदान सुकवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले मात्र आज पुन्हा मुसळधार झालेल्या पावसामुळे अखेर सभा रद्द करावी लागली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील आपल्या पहिल्या सभेतून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार होते.काल झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिकल साठला होता. मात्र कार्यकर्त्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला पण सभेपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर आजची सभा रद्द करावी लागली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्या मुंबईतील सांताक्रुझ पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. ईडीच्या चौकशीनंतर शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मनसे विधानसभा निवडणुका लढविणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.आपल्या पहिल्याच सभेत ते कोणाचा समाचार घेणार याची उत्सुक्ता होती मात्र पावसाने सभेवर पाणी फिरविल्याने उद्याच्या मुंबईतील सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण
पाकिस्ताननं गेले सहा महिने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमधून ...

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर
युवा सेना प्रमुख व ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे ...

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून ...

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प,  जाणून घ्या सत्य
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. ...