राज ठाकरे यांनी सांगितले शरद पवार व त्यांना ईडी चौकशी लावण्या मागचे कारण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवणार असून लवकरच सर्व उमेदवार देखील जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट तर केलीच सोबतच ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं मोठे कारण सर्वांना सांगितले आहे.
राज म्हणाले की “माझी आणि पवार कटुंबियांमागे ED चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश असून, ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची कोहिनूर मिल खरेदीप्रकरणात ईडी चौकशी झाली. तर शरद पवार यांचं नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आलं होते. त्यामुळे आता राज ठाकरे प्रचार सभात सरकारवर जोरदार टीका करणार हे उघड आहे.