11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री, या 7 चुका टाळा
महादेवाची पूजा करताना या चुकुनही हे 7 प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी-
1- शंख जल- महादेवाने शंखचूड नावाच्या असुराचे वध केले होते. शंख त्याचं असुराचा प्रतीक मानले गेल्यामुळे शिवाची पूजा करताना याचा वापर केला जात नाही. तो प्रभू विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंची पूजा करताना शंख वापरण्यास हरकत नाही.
2- पुष्प- महादेवाला केशर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, कुन्द, जूही इतर फुलं अर्पित करु नये.
3- करताल- महादेवाची पूजा करताना करताल वाजवू नये.
4- तुळशी- जलंधर नावाच्या असुराची पत्नी वृंदाच्या अंशाने तुळशीचा जन्म झाला होता. तिला भगवान विष्णुंनी आपल्या पत्नीच्या रुपात स्वीकारले होते म्हणून शिव पूजेत
तुळशी वापरु नये.
5- काळे तीळ- तीळ प्रभू विष्णुंच्या मळापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते म्हणून शिवाला काळे तीळ अर्पित करु नये.
6- तुटलेल्या अक्षता- महादेवाला अक्षता किंवा अख्खे तांदूळ अर्पित करण्याबद्दल शास्त्रांमध्ये लिहिले आहे की तुटलेले तांदळू अपूर्ण व अशुद्ध असतात म्हणून देवाला अर्पित
करु नये.
7- कुंकु- हे सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हाकि शिव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकु अर्पित करु नये.