मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:08 IST)

Mahashivratri 2021 महाशिवरात्री शुभ मुहूर्त येथे जाणून घ्या

Mahashivratri 2021 date timing shubh muhurat pujavidhi
महादेवाची पूजा करण्यासाठी महाशिवरात्री पर्व सर्वोत्तम मानले गेले आहे. या दिवशी महादेवाच्या भक्तांचा उत्साह जोरावर असतो. जाणून घ्या यंदा कधी येत आहे महाशिवरात्री-
 
पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री 11 मार्च 2021 गुरुवारी साजरा करण्यात येईल.
 
महाशिवरात्री व्रत आणि पूजा शुभ मुहूर्त
 
महाशिवरात्री: 11 मार्च 2021
निशिता काल पूजा वेळ: 00:06 ते 00:55, मार्च 12
अवधी: 00 घण्टे 48 मिनिट
12 मार्च 2021: शिवरात्री पारण वेळ - 06:34 ते 15:02
रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ: 18:27 ते 21:29
रात्री द्वितीय प्रहर पूजा वेळ: 21:29 ते 00:31, मार्च 12
रात्री तृतीय प्रहर पूजा वेळ: 00:31 ते 03:32, मार्च 12
रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ: 03:32 ते 06:34, मार्च 12
चतुर्दशी तिथी प्रारम्भ: 11 मार्च रोजी 14:39 वाजता
चतुर्दशी तिथी समाप्त: 12 मार्च रोजी 15:02 वाजता
 
संक्षिप्त पूजा विधी
शिवरात्रीच्या दिवशी स्नान केल्यानंतर व्रत संकल्प घ्यावे.
नंतर विधीपूर्वक पूजा आरंभ केली पाहिजे.
पूजा दरम्यान कळशात पाणी किंवा दूध भरुन शिवलिंगवर अर्पित करावं.
शिवलिंगावर बेलपत्र, आकड्याचे फुलं, धतूरा, इतर अर्पित करावे.
या दिवशी शिवपुराण, महामृत्युंजय मंत्र, शिव मंत्र आणि शिव आरती पाठ करावा.
महाशिवरात्रीला रात्री जागरण करावे.