शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (17:36 IST)

हरतालिका: आपल्या राशीप्रमाणे जपा महादेव मंत्र आणि दाखवा नैवेद्य

हरतालिकेच्या दिवशी महादेवाची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. जर आपण या दिवशी आपल्या राशीप्रमाणे महादेवाच्या मंत्राचे जप केले आणि आपल्या राशीप्रमाणे महादेवाला नैवेद्य अर्पित केले तर आपल्यासाठी शुभ ठरेल. आपल्या मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या भक्तीने महादेव प्रसन्न होतील. तर जाणून घ्या कोणत्या राशीच्या स्त्रियांनी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नैवदे्य म्हणून कोणती वस्तू अर्पण करावी.
 
मेष
मंत्र: 'ॐ शिवाय नम:'
नैवेद्य: सफरचंद
 
वृषभ
मंत्र : 'ॐ हवि नम:'
नैवेद्य: दूधाची मिठाई
 
मिथुन
मंत्र: 'ॐ अनघ नम:' 
नैवेद्य: मध
 
कर्क 
मंत्र: 'ॐ तारक नम:' 
नैवेद्य: खडीसाखर
 
सिंह 
मंत्र: 'ॐ कपाली नम:' 
नैवेद्य: ‍डाळिंब
 
कन्या 
मंत्र: 'ॐ वामदेव नम:' 
नैवेद्य: तुप
 
तूळ
मंत्र : 'ॐ श्रीकंठ नम:' 
नैवेद्य: दही
 
वृश्चिक 
मंत्र: 'ॐ अज नम:' 
नैवेद्य: मौसंबी
 
धनू
मंत्र : 'ॐ शितिकंठ नम:' 
नैवेद्य: केळी
 
मकर 
मंत्र: 'ॐ मृगपाणी नम:' 
नैवेद्य: नाशपाती
 
कुंभ
मंत्र: 'ॐ अव्यय नम:' 
नैवेद्य: नारळ
 
मीन 
मंत्र: 'ॐ महादेवाय नम:' 
नैवेद्य: चीकू