श्रावणातल्या अवसेच्या दिवशी पिठोरीची कहाणी नक्की वाचावी

pithori amavasya story in marathi
Last Modified मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (07:17 IST)
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचा श्रद्धा असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्ष झालं.

सातव्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई- बाई तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आली तशी लवकर जा. नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली बाई- बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली.

ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्याच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसासर्‍यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेला ही असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेला मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून रडू लागली.

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको अशी थोडी पुढे जा तिथं तुला एका शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीर-पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहते. कोण कोठून अशी चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग.
ब्राह्मणाच्या सुनेना बरं म्हटलं. तिथून उठली पुढं गेली. एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे- तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. नागकन्या, देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्या आणि तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरानी दाखविली. पुढे तिच्यासाठी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं.
पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं यांना काय होतं? आसरानी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत सुखा-समाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळा दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ सुनेवरुन आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हात- पाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखाने नांदू लागली.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Guru Pushya Special : गुरु पुष्य नक्षत्र, काय खरेदी करावे, ...

Guru Pushya Special : गुरु पुष्य नक्षत्र, काय खरेदी करावे, काय नाही जाणून घ्या
Guru Pushya Nakshatra 2021: गुरु पुष्य नक्षत्र मध्ंस शिल्पकला आणि चित्रकला याचा अभ्यास ...

दिवाळी 2021: दिवाळीच्या रात्री हे 5 प्राणी पाहणे शुभ

दिवाळी 2021: दिवाळीच्या रात्री हे 5 प्राणी पाहणे शुभ
दिवाळीला एका महान सणाचा दर्जा मिळाला आहे कारण हा सण सलग पाच दिवस चालतो. या उत्सवाची तयारी ...

आमला नवमी 2021: आवळा नवमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त ...

आमला नवमी 2021: आवळा नवमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
हिंदू धर्मात आवळा नवमीला विशेष महत्त्व आहे. याला अक्षय नवमी असेही म्हणतात. हिंदू ...

Diwali 2021 तुम्हालाही धुळीची अ‍ॅलर्जी असेल तर या गोष्टींची ...

Diwali 2021 तुम्हालाही धुळीची अ‍ॅलर्जी असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, दिवाळीत साफसफाई करण्यात कोणतीही अडचण येणार नाही
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...

Pushya Nakshatra 2021: दिवाळीआधी गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ ...

Pushya Nakshatra 2021: दिवाळीआधी गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या 6 खास गोष्टी
पुष्य नक्षत्र 2021: 27 नक्षत्रांपैकी एक, गुरु पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले ...

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...