1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:29 IST)

भेटेल तो शिव, जीवास निश्चित होईल भास

Mahashivratri
शिवशम्भो, आली आली ती रात्र जगरणा ची,
तयारी करावी शिवगौरी च्या शुभ विवाहाची,
व्रत करावं, तेव्हा पावतो हा भोलानाथ,
घ्यावं दर्शन शिव-पार्वती च मारावी हाक आर्त,
भोळा सांब सदाशिव, भेटतो भक्तांस,
जावं शिव मंदिरी , महाशिवरात्रीस दर्शनास,
वाहून बेलपत्र, वाहावी त्यासी श्रध्दासुमन,
श्रधाभावें करावं शिवपार्वती स नमन,
करुनी जप तप होईल वातावरण शुद्ध आसपास,
भेटेल तो शिव, जीवास निश्चित होईल भास!
...अश्विनी थत्ते.