शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज महाशिवरात्रीला यावर्षी ‘शश योग’ आला आहे. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार हा योग तब्बल ५९ वर्षानंतर आला आहे. त्यामुळे भक्तांसाठी ही विशेष पर्वणी असणार आहे. याआधी हा योग १९६१ ला आला होता.
 
यादिवशी शनि आणि चंद्र हे मकर राशीत, गुरु धनू राशीत, बुध कुंभ राशीत तर शुक्र मीन राशीत असणार आहे. हा योग साधना करण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष असतो असं जोतिष्यांचं म्हणणं आहे.
 
या योगामध्ये विशेष दान-पुण्य करण्याचही महत्व आहे. त्यामुळे भक्तांना महादेवाची विशेष कृपा मिळवण्याची संधी असणार आहे असं देखील जोतिष्यांचं म्हणणं आहे. तसंच यादिवशी सर्वार्थ सिद्धी योगही असणार आहे. महादेवाचा रुद्राभिषेक या यादिवशी करून भक्तांना विशेष लाभ मिळवण्याची संधी आहे.