महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय करावे आणि कोणते कार्य टाळावे हे जाणून घ्या-
महाशिवरात्रीला काय करावे
1. महाशिवरात्रीला व्रत करावे.
2. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे.
3. शुभ काळात मंदिर जाऊन महादेवाला जल आणि दूध अर्पित करावे.
4. या दिवशी महादेवाचं ध्यान करून ओम नमः शिवाय जप करावा.
5. या दिवशी अन्न ग्रहण करत नाही. जर आपण व्रत करत असाल तर दूध आणि केळी याचे सेवन करू शकता. शक्य असल्यास या दिवशी केवळ फळाहार करावा आणि दुसर्या दिवशी व्रत सोडावे.
महाशिवरात्रीला काय टाळावे
1. महाशिवरात्रीला मास किंवा मदिरा सेवन करून नये.
2. महाशिवरात्रीला उशीरापर्यंत झोपू नये.
3. महाशिवरात्रीला डाळ, तांदूळ किंवा गव्हाने तयार पदार्थ खाऊ नये. या दिवशी केवळ फळ आणि दूध याचे सेवन करावे.
4. महादेवाला प्रसन्न करू इच्छित असल्यास या दिवशी काळे कपडे परिधान करू नये.
5. या दिवशी महादेवाला अर्पित प्रसाद खाऊ नये असे म्हटलं जातं.
महाशविरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा जप करा
ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्व: भुव: भू: ॐ स: जूं हौं ॐ ।
महामृत्युंजय मंत्र जप केल्याने प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते.