शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (10:18 IST)

Gandhi Jayanti 2022 : महात्मा गांधींबद्दल 25 रोचक गोष्टी

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला होता. त्यांच्याबद्दल अजून खूप काही आहे जो लोकांना माहित नाही. तर चला जाणून घेऊया 25 रोचक तथ्य ( 25 Interesting facts of Mahatma Gandhi).
 
1. महात्मा गांधी यांनी प्रत्येकाकडून काही न काही शिकले कारण त्यांच्यात शिकण्याची आवड होती.
 
2. महात्मा गांधी यांना भगवान महावीर, महात्मा बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण आवडत असे.
 
3. त्यांच्याकडे नेहमी गीता असायची जेव्हाकि ते महावीर स्वामी यांच्या पंचमहाव्रत आणि महात्मा बुद्ध यांच्या आष्टांगिक मार्ग याचे अनुसरण करायचे.
 
4. महात्मा गांधी आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी 18 किलोमीटर पायी चालत होते, जे त्यांच्या हयातीत पृथ्वीच्या 2 आवर्तनांच्या बरोबरीचे होते.
 
5. ते आपल्या आरोग्याप्रती जागरुक होते आणि 110 वर्ष जगू इच्छित होते.
 
7. पोटाची उष्णता शमवण्यासाठी ते पोटावर ओल्या मातीच्या पट्ट्या बांधत असे.
 
8. महात्मा गांधींना इंग्रजी शिकवणारी व्यक्ती आयर्लंडची रहिवासी होती. महात्मा गांधी अगदी सामान्य इंग्रजी बोलत होते. गांधीजींची मातृभाषा गुजराती होती. शाळेत ते इंग्रजीत चांगले विद्यार्थी होते, तर गणितात सरासरी आणि भूगोलात कमकुवत होते.
 
9. स्वातंत्र्यानंतर काही इंग्रजी पत्रकार महात्मा गांधींकडे आले आणि त्यांची इंग्रजीत मुलाखत घेऊ लागले. यावर महात्मा गांधी हिंदीत म्हणाले की, माझा देश आता स्वतंत्र झाला आहे. आता मी फक्त हिंदीत बोलेन.
 
10. गांधीजी कधीही अमेरिकेला गेले नाही. वर्ष 1930 मध्ये त्यांना अमेरिकेच्या टाइम मॅगजीन ने Man Of the Year या उपाधी ने सन्मानित केले होते.
 
11. गांधीजी यांनी आपल्या जीवनात कधीही विमानाने प्रवास केला नाही ते रेल्वेने प्रवास करायचे.
 
12. एकदा रेल्वे प्रवासात महात्मा गांधींचा जोडा खाली पडला. त्यांनी आपला दुसरा बूटही फेकून दिला. पुढच्या प्रवाशाने कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, एका बुटाचा मला काही उपयोग होणार नाही. किमान भेटलेल्या व्यक्तीला दोन्ही जोडे घालण्याची संधी मिळेल.
 
13. गांधीजींना फोटो काढवण्यात मुळीच रस नव्हता परंतु त्यांची बहुतेक छायाचित्रे स्वातंत्र्याच्या काळात काढण्यात आली होती.
 
14. ज्यांचे लेखन चांगले नाही, असे बुद्धिमान लोक त्यांच्या बचावात म्हणतात की गांधीजींचे लेखनही चांगले नव्हते. तर जाणून घ्या की महात्मा गांधींचे लेखन खरोखरच चांगले होते. शाळेत त्यांचे हस्ताक्षर खूप सुंदर होते.
 
15. गांधीजी आपल्या आई-वडिलांचे सर्वात लहान अपत्य होते त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती.
 
16. गांधीजी यांनी दक्षिण अफ्रीकेच्या सत्याग्रह संघर्ष दरम्यान, जोहांसबर्ग हून 21 मैल अंतरावर 1100 एकरांची छोटी वसाहत, टॉलस्टॉय फार्म स्थापित केली होती.
 
17. गांधीजी यांनी अल्फ्रेड हाय स्कूल, राजकोट येथून शिक्षण घेतले होते.
 
18. गांधीजी यांचा जन्म शुक्रवारी झाला होता, भारताला स्वातंत्र्य देखील शुक्रवारी मिळाले होते आणि गांधीजी यांची हत्या देखील शुक्रवारी झाली होती. बिर्ला भवनच्या बागेत गांधीजींची हत्या झाली. त्यांच्या अंत्ययात्रेत सुमारे 10 लाख लोक चालत होते आणि 15 लाखांहून अधिक लोक वाटेत उभे होते.
 
19. मार्टिन ल्यूथर किंग, लिओ टॉल्स्टॉय, अल्बर्ट आइनस्टाईन, नेल्सन मंडेला, रवींद्रनाथ टागोर, दलाई लामा, जॉर्ज बर्नार्ड शॉ, पर्ल एस बक, आंग सान स्यू की, नरेंद्र मोदी, बराक ओबामा, अमर्त्य सेन, पंडित जवाहरलाल नेहरू, जे.बी. कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल, खान अब्दुल गफार खान, जयप्रकाश नारायण, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, कमलादेवी चट्टोपाध्याय, जे.सी. कुमारप्पा, मीरा बेन, मृदुला साराभाई, सी. राजगोपालाचारी, विनोभा भावे, बाबा आमटे, जेम्स लॉसन, स्टीव्ह बिको, रोमेन रोलँड, मारिया लासार्डा डी मौरा, लान्झा डेल वास्तो, मॅडेलिन स्लेड, जॉन लेनन, अल गोर, जमनालाल बजाज, धरमपाल, डॉ. राजेंद्र प्रसाद, ठक्कर बापा, रविशंकर महाराज, नानाभाई भट्ट, राजकुमारी अमृत कौर, सुशीला नायर, आशा देवी, आर्यनायकम, कमलादेवी चट्टोपाध्याय, मृदुला साराभाई इत्यादी अनेक महान लोक आहेत ज्यांच्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव आहे. 
 
20. महात्मा गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांचे मित्र जीवनलाल देसाई यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्या कोचरब बंगल्यावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रह आश्रम बांधला. पुढे 17 जून 1917 रोजी त्यांनी साबरमती नदीच्या काठावर सुमारे 36 एकर मोठ्या जागेवर सत्याग्रह आश्रमाची पुनर्स्थापना केली. पुढे नदीच्या नावावरून हा आश्रम साबरमती आश्रम म्हणून ओळखला जाऊ लागला. हा आश्रम अभियंता चार्ल्स कोरिया याने बांधल्याचे सांगितले जाते.
 
21. गांधीजी हे आपले खोटे दात धोतरात बांधून ठेवत असे. ते अन्न खातानाच लावायचे.
 
22. त्यांना 5 वेळा नोबल पुरस्कारासाठी नामित करण्यात आले होते मात्र 1948 मध्ये पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली.
 
23. महात्मा गांधींना सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले होते. 4 जून 1944 रोजी सिंगापूर रेडिओवरून संदेश प्रसारित करताना महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता' असे संबोधण्यात आले.
 
24. 1934 मध्ये भागलपूर येथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांच्या ऑटोग्राफसाठी प्रत्येकी पाच रुपये घेतले होते.
 
25. महात्मा गांधींनी कायद्याचा सराव सुरू केला तेव्हा त्यांचा पहिला खटला हरले होते. भारतातील एकूण 53 प्रमुख रस्त्यांना महात्मा गांधींची नावे देण्यात आली आहेत. देशातच नाही तर परदेशातही एकूण 48 रस्त्यांना महात्मा गांधींची नावे आहेत.
 
संकलन : अनिरुद्ध जोशी

Edited by: Rupali Barve