Dharma Sangrah

मकर संक्रांती 2025 तारीख, मुहूर्त आणि धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Updated: मंगळवार, 14 जानेवारी 2025 (08:47 IST)
पिके कापणी :
1. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, तामिळनाडू इत्यादी अनेक राज्यांमध्ये, नवीन पिके घेण्याची ही वेळ आहे, म्हणून शेतकरी मकर संक्रांती हा निसर्गाच्या कृतज्ञतेचा दिवस म्हणून साजरा करतात.
2. पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मकर संक्रांती लोहरी म्हणून साजरी केली जाते. तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवली जाते.
ALSO READ: Makar Sankranti : मकर संक्राति शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीशी संबंधित सण:
1. हिंदू धर्मात मकर संक्रांतीशी संबंधित अनेक सण आहेत जे स्थानिक वेळेनुसार आणि राज्यानुसार साजरे केले जातात. जसे की लोहरी, पोंगल, उत्तरायण, माघ/भोगली बिहू इ.
2. तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगल साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायण साजरी केली जाते. हरियाणा आणि जम्मूमध्ये लोहरी साजरी केली जाते. आसाम आणि ईशान्येकडील काही भागात माघ/भोगली बिहू साजरा केला जातो.
3. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका हळदी-कुंकु समारंभाचे आयोजन करतात व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात.
ALSO READ: मकर संक्रांतीला या प्रकारे करावे सुगड पूजन
महाराष्ट्रात मकर संक्राति
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे. स्त्रिया एकमेकांना वाण आणि तिळगूळ देतात. मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीष घेतात. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण थाटात साजरा केला जातो.
ALSO READ: मकर संक्रांती निबंध Makar Sankranti Essay
मकर संक्रांतीच्या परंपरा :
1. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू, पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे.
2. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. विशेषत: गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
3. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला, लोक आग पेटवून त्यात रेवडी, शेंगदाणे, तीळ गूळ, नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात.
4. मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याचीही परंपरा आहे.
5. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे.
6. मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये मेळ्यांचे आयोजन केले जाते.
7. मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा, नदीस्नान आणि दानधर्मासोबत पितरांना अर्पण करण्याची परंपरा आहे.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments