Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?
Makar Sankranti 2025 सनातन धर्मात मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्य देवाचा मकर राशीत प्रवेश होतो, हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभही मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सणही नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीचा सण भारतातील विविध राज्यांमध्ये पोंगल, लोहरी, बिहू इत्यादी नावांनीही ओळखला जातो. या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. आता अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जात नाही? याबद्दल सविस्तर जाणून घ्या -
स्टील, एल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू: मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील, एल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूंचे दान करु नये. आवा म्हणून अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात जे शुभ नाही.
काचेच्या वस्तू - या दिवशी काचेच्या वस्तू दान करु नये हे अशुभ मानले गेले आहे.
वापरलेल्या वस्तू: या दिवशी वापरलेल्या वस्तू जसे वस्त, तेल, भोजन, मीठ याचे दान करु नये. या वस्तूंचे दान करायचे असतील तर घरातून न घेता बाजारात दान देण्याच्या संकल्प करत खरेदी करुन आणावे आणि मग दान करावे.
झाडू: या दिवशी झाडू दान करणे अशुभ मानले गेले आहे. झाडू दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे. असे केल्याने घरात दारिद्रय येतं आणि समृद्धी निघून जाते.
तीक्ष्ण वस्तू- मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तूंचे दान चुकूनही करू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते. टोकदार वस्तू दान देण्यासाठी अशुभ मानल्या जातात. हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात.
या दिवशी सवाष्णींना खिचडी, तिळगूळ, सौभाग्याच्या वस्तू, नवीन वस्त्र दान करावे. याने सुख-समृद्धी राहते. या दिवशी पात्र दान, वस्त्र दान, गौ दान, तिळगूळ आणि खिचडी दान याचे अत्यंत महत्तव आहे.