sankrant | संक्रांतीचा धार्मिक पैलू
|
ऋतू बदलत असल्याने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी तीळमिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावावे, तीळ होम करावा, या सार्या विधींसोबतच तीळ भक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण संक्रांतीला तीळ भक्षण करत असतो.
|
या काळात खालील बाबी कटाक्षाने टाळाव्यात :
पर्वकालात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष- गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे, आदी कामे करू नयेत.
संक्रांत पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :
नवे भांडे, गायीला घास, तीळपात्र, सोने, गाय, वस्त्र, घोडा, गूळ इत्यादी यथाशक्ती दाने करावीत.
मकर संक्रांतीचा शुभेच्छा...
