शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा २३ वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार
केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा २३ वा हप्ता उद्या, २० जून २०२६ रोजी पश्चिम बंगालमधून वितरित केला जाईल. या योजनेचा लाभ कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी दरवर्षी एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उद्या, हा कार्यक्रम दुपारी ३:४५ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता उद्या पश्चिम बंगालमधून वितरित केला जाईल. पीएम किसान योजनेचा हप्ता येथून पहिल्यांदाच वितरित केला जात आहे. २३ वा हप्ता उद्या पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित केला जाईल. तसेच पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्याअंतर्गत ₹२,००० दिले जातात. याची एकूण वार्षिक रक्कम ₹६,००० होते. त्यामुळे, २३ व्या हप्त्यात लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹२,००० मिळतील.
Edited By- Dhanashri Naik
