मंगळ मंदिर अमळनेरमध्ये हवनात्मक पूजेचे महत्त्व काय?
Mangal Grah Mandir Amalner जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल किंवा जर तुम्हाला मांगलिक दोषाचा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असलेल्या मंगळाच्या प्राचीन मंदिराला भेट द्या. मंगळदोषाच्या शांतीसाठी अमळनेरमध्ये दर मंगळवारी पंचामृत अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, नित्य प्रभात श्री मंगळ अभिषेक, हवनात्मक शांती, भोमयाग आदी पूजा व अभिषेक केले जातात. वरील पूजा व अभिषेक केल्याने मांगलिक दोष कायमचा नाहीसा होतो.
हवनात्मक शांती म्हणजे काय?
अभिषेक म्हणजे देवतेला आंघोळ घालणे आणि नंतर पूजा करणे. नित्य प्रभात श्री मंगळ अभिषेक किंवा पंचामृत अभिषेकमध्ये देवाला दूध, दही, तूप, साखर आणि मधाने स्नान घातले जाते. स्वतंत्र अभिषेक करताना, हे कार्य पद्धतशीरपणे नामजप करून अधिक चांगल्या प्रकारे केले जाते. जर तुमचा कुंडलीत नीच किंवा सौम्य मंगळ असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता.
परंतु जर तुमचा कुंडलीत मंगळ कडक असेल तर तुम्ही हवनात्मक शांती करावी. अभिषेकात आपण देवाला आंघोळ करून त्याची पूजा करून प्रसन्न करतो तर हवनात आपण देवाला भोजन देऊन प्रसन्न करतो. हवन हे देवाचे अन्न आहे. त्यात तूप, तीळ, जव इत्यादी सर्व हवन साहित्य अर्पण करून आपण देवाला प्रसन्न करतो. जर तुम्हाला कडक मंगळ असेल तर तुम्ही हवन करावे.
हवनात्मक पूजेमध्ये हवनाची संपूर्ण साहित्यसह समजावून पूजा केली जाते. ही पूजा सुमारे 2 ते अडीच तास चालते. या पूजेसाठी दक्षिणा देऊन तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता. असे मानले जाते की ते किती ही कडक मंगळ असो तरी त्याचे निराकरण होते.
जर तुम्ही शेतकरी, बिल्डर, प्रॉपर्टी ब्रोकर, शेतमजूर, भाजीपाला किंवा धान्य व्यवसाय, माळी, फुलांचा किंवा फळांचा व्यवसाय किंवा सिव्हिल इंजिनियर अशा व्यवसयाता असाल तर तुमचे दैवत मंगळ देव आहे. अशात कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील तर तुम्ही हवनात्मक पूजा करून घेऊ शकता.