सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. मणिपूर विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:18 IST)

Manipur Election 2022: निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

मणिपूरच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की या प्रवासात अनेक चढउतारानंतर हे राज्य महत्त्वाच्या पातळीवर पोहोचले आहे. जिथून मागे वळून पाहण्याची गरज नाही.
 
त्यांनी म्हटले की 50  वर्षांच्या प्रवासानंतर आज मणिपूर एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभं आहे. राज्याने वेगाने विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि अडथळे आता दूर झाले आहे अशात इथून मागे वळून पाहण्याची गरज नाही.
 
येत्या दशकासाठी नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पना घेऊन चालायचे असे ते म्हणाले. त्यांनी तरुणांना विकासाच्या 'दुहेरी इंजिन'सह मणिपूरला अधिक वेगाने पुढे नेण्यात योगदान देण्याचे आवाहन केले.