मणिपूरमध्ये निवडणूक आयोगाने बदलल्या मतदानाच्या तारखा
निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा बदलल्या आहे. निवडणूक आयोगाच्या जुन्या निर्णयानुसार मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान 27 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 मार्चला होणार होते, मात्र आता नव्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्याचे मतदान 28 फेब्रुवारीला होणार आहे आणि दुसरा टप्पा 5 मार्चला रोजी पार पडेल.
मुख्य निवडणूक आयुक्त मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले असताना त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
Election Commission revises Assembly poll dates for Manipur
— ANI (@ANI) February 10, 2022
Voting for the first phase of elections to take place on Feb 28 instead of Feb 27
Second phase of voting to happen on March 5 instead of March 3 pic.twitter.com/igACD2GoLo
मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी सांगितले होते की सिंगजामेई, थौबल, याइसकुल, वांगखेई आणि चुराचंदपूर या पाच विधानसभा मतदारसंघातील त्यांचे बूथ केवळ महिलाच सांभाळतील.
