अॅट्रोसिटी कायद्या बदल शक्य नाही - मुख्यमंत्री
काही जणांकडून अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जातो, त्यामुळे हा कायदा आणि त्यामध्ये बदल करण्याची मागणी पुढे आली आहे. अॅट्रोसिटी कायद्याचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यामध्ये आपण फेरबदल करूच शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या कायद्याचा जर कोणी गैरवापर करत असेल, तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विधानसभेतील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र एक विधिमंडळ समिती स्थापन करून अश्या सर्व केसेस आम्ही तपासणार आहोत जर खोट्या असतील आणि उगीच कायदा वापरात आला असले दुरपयोग असेल तर नक्की कारवाई करणार असे मुख्यमंत्री आयांनी स्पष्ट केले.