शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (17:14 IST)

मराठा आरक्षण ही संवैधानिक प्रक्रिया, कोर्टात भक्कम बाजू मांडू - मुख्यमंत्री

नागपूरमध्ये बुधवारी मराठा मूक  मोर्चा काढण्यात आला.  मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी “कोपर्डी बलात्काराची घटना निंदनीय आहेच.  20 तारखेपासून कोपर्डी बलात्काराची दररोज सुनावणी सुरु होईल. तसंच अट्रॉसिटीचा दुरुपयोग टाळण्यासाठी अभ्यास सुरु आहे. तर मराठा आरक्षण ही संवैधानिक प्रक्रिया आहे. कोर्टात आम्ही भक्कम बाजू मांडू”असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याआधी “आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकामी हाती पाठवू नका”, असं म्हणत मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे  निवेदन दिले.