बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (10:34 IST)

मराठा क्रांती मोर्चाकडून ८ डिसेंबरला विधानभवनावर धडक मोर्चा

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात समाज वाहनांमधून सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली. त्यानंतर राजेंद्र कोंढरे ही माहिती दिली. कोंढरे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाला आहे. अकरावी प्रवेशात अनेकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. वैद्यकीय प्रवेशाबाबत मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. एमएसईबी व इतर नोकरभरतीबाबत दिलेला शब्द फिरविला आहे. कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळण्याआधीच शिक्षणमंत्र्यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविल्याने  दुसऱ्या यादीत प्रवेश मिळू शकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे गायकवाड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. 
 
याविरोधात ८ तारखेला मुंबईतील विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.  तत्पूर्वी, दि. १ व २ डिसेंबर रोजी महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. राज्यभरातून आरक्षणासंदर्भात निवेदने घेऊन सुप्रीम कोर्टाच्या पाठविली जाणार आहेत.