मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

मराठा क्रांती मोर्चाच्याचे आंदोलनाचे नियोजन पूर्ण, विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलने होणार

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्यभरातील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आले आहे. यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन होणार नाही. विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलन होतील. तसेच बंद पुकारले जातील. येत्या 21 सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत 20 सप्टेंबरला ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे.
 
दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, असे सांगितले होते. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.