शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (21:28 IST)

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे

pankaja munde
Pankaja Munde भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच, २०२४ इतिहास घडवणारं म्हणजेच बदलणारं वर्ष आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमधील एक सभेत बोलत होत्या.
 
मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटलं, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं सांगितलं होतं. आता ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
 
आपल्याला दुधही पोळलेलं असून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे. मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही. मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर म्हटलं, ते मला माहिती नाही. पण, मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.