रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (09:14 IST)

मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण चर्चेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अर्थात सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला आरक्षणास विलंब होत असल्याने पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर इतर पक्षांच्याही आमदारांनी राजीनामे दिले होते. यापार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ग्रामीण भागातील शिवसेनेचे आमदार आणि नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावरुन सध्या मराठा समाजामध्ये सरकारविरोधी वातावरण आहे. शिवसेनाही सरकारचा एक भाग आहे. त्याअनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.