रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (16:27 IST)

मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण स्थगित

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 17 सप्टेंबर पासून मराठा समाजाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला अंतरवली सराटी येथे बसले होते. त्यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस असून मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळली.त्यांना सलाईन देण्यात आली. त्यांच्यावर उपचार सुरु केले. 

त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची माहिती प्रसार माध्यमांशी संवाद साधून घोषणा केली. ते म्हणाले, सालीं लावून उपोषण करणे आवडत नाही. आता ते रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहे. त्यांनी उपोषण माघारी घेतले आहे. 
 
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी केली असून सकल मराठा समाजासाठी ते लढत आहे. अद्याप ते आपल्या मागणीवर ठाम आहे. त्यांचे हे सहावे आमरण उपोषण आहे. जालना येथील अंतरवली सराटी येथे ते 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाच्या आठव्या दिवशी मंगळवारी काल रात्री त्यांची तब्बेत घालवली आणि मराठा समाजाच्या इतर कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी सलाईन आणि औषधोपचार घेण्यास तयार झाले.आता त्यांनी स्वतःने उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.  
Edited By - Priya Dixit