बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:48 IST)

चौदा हजार विद्यार्थी पुन्हा माय मराठी कडे

maratha aarakshan
आधुनिक शिक्षण मिळावे या कारण करिता अनेक विद्यार्थी पालक आपले पाल्य इंग्रजी शाळेत टाकतात, त्यामुळे अनेक मरठी शाळा ओस पडल्या असे चित्र होते. मात्र एक चांगली गोध्त घडली आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत  माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की  इंग्रजी शाळेत गेलेले एकूण  14000 मुलं इंग्रजी शाळा सोडून पुन्हा आपल्या मराठी  जिल्हा परिषदेच्या  शाळांमध्ये दाखल झाली आहेत. तर जिल्हा निहाय आकडेवारी सुद्धा त्यांनी दिली आहे. चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि स्पोकन इंग्लिशवर भर दिल्यानं जिल्हापरिषदेच्या शाळेतला ओढा वाढल्याचंही तावडेंनी म्हटल आहे. यावेळी तावडेंनी प्रयोगशील शिक्षकांचं विशेष अभिनंदनही केलं आहे. तर त्यांनी शिक्षकांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे.