शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (11:32 IST)

मराठा आरक्षण: मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाशी छेडछाड केली जाणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षण:मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी चंद्रपुरात 21 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपोषणस्थळी पोहोचले मराठा -ओबीसी वाद निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी राज्य सरकार घेणार असल्याचे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका शासना कडून घेण्यात आली .
 
 राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे 4000 कोटी रुपयांच्या योजनांची अमंलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 3 तास चालणाऱ्या या बैठकीत इतर मागासवर्ग, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधीं उपस्थित असून त्यांनी आपापले म्हणणे मांडले. 

या बैठकीत कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री  शिंदे यांनी  सांगितले की, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.
 
राज्यातील सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या महामंडळाना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
Edited by - Priya Dixit