मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (07:29 IST)

मराठा आरक्षण आंदोलनात मुंबईतील डबेवाल्याचा सक्रीय सहभाग

मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन सुरू असताना यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनीही आता महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णयच त्यांनी थेट खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याशी भेट घेऊन सांगितला आहे. 
 
भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या जनआंदोलनाची साद दिली तर, त्यावेळी मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळातील ५००० सदस्य आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही यावेळी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं संभाजीराजे यांना दिली.
 
मुंबई डबेवाहतुक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं अशी मागणीवजा विनंतीही त्यांनी केली.