1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:47 IST)

पुणे ते साष्ट पिंपळगाव मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन

Organizing
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव अशी मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
ही संघर्ष यात्रा ४ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघणार असून ५ फेब्रुवारी रोजी जालना येथे पोहोचणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात होईल. शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रोड, वाघोली, शिक्रापूर, राजंणगाव, शिरूर, सुपा, नगर, आमळनेर मार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बीड येथून पुन्हा सुरुवात होणार आहे. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.