रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (10:27 IST)

गुरुची आरती... आरती सद्‌गुरुची सुख कल्पतरुची

आरती सद्‌गुरुची । सुख कल्पतरुची ॥
सच्चिदानंद नामें । गातां अतर्क्य रुची ॥ धृ. ॥
 
चिच्छक्ति सत्व झालें ।ज्ञान प्रत्यया आलें ॥
सत्पदात्मचि तेव्हां । नाम चित्पदा केलें ॥ १ ॥
 
इंद्रीयां विश्वगम्य । रजतमही शम्य ॥
सत्पदी भासताहे । दोरी भुजगोपम ॥ २ ॥
 
सत्व हें उपनेत्र । त्यागे पाहती नेत्र ॥
पाहणें नेत्रधर्म । हा उपनेत्र हेतु मात्र ॥ ३ ॥
 
सत्पद अधिष्ठान । तेंची चित्पदज्ञान ॥
उठता ज्ञानशक्त । नसे वस्तूची आन ॥ ४ ॥
 
शर्करा शुभ्र साची ॥ गोडी चाखतां तीची ॥
वस्तुसी बोध नाहीं ॥ रीति अनुभवाची ॥ ५ ॥
 
दृष्टीसी शुभ्ररुप गोड नसतें तूप ।
सच्चिदानंद तीन्ही ॥ पिंड एक स्वरूप ॥ ६ ॥
 
सुषुप्ती माजीं ऊरे ॥ नित्यसुख तें स्फुरे ॥
लाभ तो बोलवेना ॥ जेथें मन ही मुरें ॥ ७ ॥
 
मृगास जल भेटें ॥ सूख विषयीं वाटे ॥
विषय मृगजळ ॥ ऊर धांवतां फुटे ॥ ८ ॥
 
इंद्रिया भोगलाहो दोही तरंग देहो ॥ दोहींत अंत्य वस्तु ॥
तेचि आनंद डोहो ॥ ९ ॥
 
श्रीगुरु स्वात्मयोगी ॥ तो चित्स्वरुपा भोगी ॥
वामन भाग्यवंत ॥ अनुभवी या जगी ॥ १० ॥