1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
  4. jai panduranga deeprati lyrics in Marathi

दिपारती

vitthal aarti
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
दीपारती ओवाळूं तुजला जिवलगा ।।धृ.।।
 
स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ।
पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ती ।
देहत्रय वाती पाजळोनी प्रीतीं ।
ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ।।जय.।।
 
देव तुज पाहतां येतो प्रेमपूर ।
नाम निरंतर गातां होतो भवपार ।
वाटे तव भक्ती ही प्रियकर ।
विष्णुदासा देई अखंड हा भर ।।जय.।।
पुढील लेख
धूपारती