1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (13:54 IST)

जय स्वामी समर्थ!!

प्रकटले स्वामी अक्कलकोटी,
मानवाच्या फक्त उद्धारासाठी,
लीला दाखविल्या त्यांनी अनंत,
त्यापरीस नाही कुठलाच संत,
भाग्यवान जन ते जे आले समीप,
मिटली चिंता, भाग्यवान ते खूप,
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी,
असंच रहा स्वामी तुम्ही माझेपाशी,
स्वरूप तुमचे डोळ्यासमोर उभेच,
प्रकटदिनी तुमच्या,हर्षित सारेच,
वाढो दिनोंदींनी भक्ती माझी अपरंपार,
स्वामी भक्ती हेच आहे आता जीवनाचे सार!
.....जय स्वामी समर्थ!!