Festival Posters

काळूबाईची आरती Kalubai Aarti

मंगळवार, 3 मार्च 2026 (15:29 IST)
॥ काळूबाईची आरती ॥
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती |
ओवाळू आरती काळूबाई तुझी मूर्ती || धृ ||
 
काळूबाई स्थान तुझं ग मांढर डोंगराशी |
वरदहस्त देउनी छाया धरी पामराशी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || १ ||
 
गोजिर मांगीर बुवा आहे गड राक्षनासी |
लाखो भक्त येती आई तुझ्या दर्शनासी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || २ ||
 
मांढर देवी गाव पवित्र तुझ्या पायथ्याशी |
करवंदीची जाळी भोवती डोंगर माथ्याशी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || ३ ||
 
लिंब नारळ चोळी पातळ मान तू घेसी |
पौषी पौर्णिमेला भक्ता दर्शन तू देसी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || ४ ||
 
चाफ्यावरती नाग डुलतो पोर्णिमेदिवशी |
मांढरदेवी माता आई स्वरूप दावीशी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || ५ ||
 
करता भक्ती तुझ्या द्वारी प्रसन्न तू होशी |
विघ्न टाळून आई इडा पीडा नेशी |
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती || ६ ||

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments